ईगलची whatsapp ग्रुपसाठी पुढीलप्रमाणे आचारसंहिता लागू केली आहे. 🎯 हा ग्रुप ईगलचा मुख्य ग्रुप असल्याने आपल्या विभागातील ब्रेकींग ,फेकींग,अनावश्यक, बातम्याच्या पोस्ट पाठवू नयेत.एकादा वेगळा उपक्रम जरुर शेयर करा. 🎯अमुक तमुक मेसेज करा..शुभ बातमी समजेल ,अशा अंधश्रद्धा पसरवणा-या पोस्ट शेअर करू नये. 🎯जातीय तेढ निर्माण होईल,कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा पोस्ट पाठवू नयेत.पत्रकारिता हिच आपली जात असे संघ मानतो. 🎯एकादा महत्वाचा vdo पाठवायचा असेल तर तो कशाबद्दल आहे हे नमूद करा. 🎯अफवा पसरतील अशा पोस्ट पुर्णपणे टाळा. 🎯इत्तर ग्रुपवर आली म्हणून एकादी पोस्ट आपल्या ग्रुपवर पाठवू नका. 🎯एकादी पोस्ट पाठवताना त्याबद्दलची सत्यता स्वतः पडताळुण पहा.आपण पत्रकार आहोत.समजले,कळाले इतर ग्रुपवर आले ..ही भाषा नंतर येता कामा नये.काही कायदेशीर अडचण आली तर त्या पोस्टबद्दल पाठवणाराच अडचणीत येतो. 🎯जे ग्रुपवर आहेत त्यांचे वाढदिवसाच्या पोस्ट जरुर पाठवा.पण जे आपल्या ग्रुपवरच नाहीत त्यांच्या वाढदिवसाच्या पोस्ट पाठवू नका.
🎯चांगल्या पोस्टची नक्की स्तुती करा.
🎯वैयक्तिक टिका टिप्पणी करू नये.
🎯अश्लिल पोस्ट टाकू नये.
🎯 ईगलने हाती घेतलेले उपक्रम पुर्ण करण्यास सहकार्य करा. 🎯शैक्षणिक, सामाजिक ,पॉजीटिव्ह , माहितीपुर्ण पोस्टचे स्वागत करण्यात येईल. 🎯 अनेकवेळा एकाद्या राष्ट्रीय सनाच्यावेळी /एकाद्या राष्ट्रीय नेत्यांची जयंती फक्त whatsapp ग्रुपवरच साजरी करताना काहीजण दिसतात. तेंव्हा whatsapp जयंती,पुण्यतिथी ,राष्ट्रीय सन साजरे करण्याऐवजी प्रत्यक्ष आपल्या विभागात साजरी करुनच फोटो पाठवावेत. 🎯 रात्री दहा वाजलेपासुन ते सकाळी सहा पर्यंत पोस्ट पाठवू नयेत.काही महत्वाचा विषय असेल तर ग्रुप एडमीन यांना कल्पना देवूनच पोस्ट पाठवा. 🎯 एकाद्या कार्यक्रमाचे कमीत कमी फोटो पाठवावेत. 🎯 वरील आचारसंहिता न पाळणारांस एकवेळ
सुचना देण्यात येईल. त्यानंतर संबंधितास कायमचे रिमूव्ह केले जाईल. 🔸 महाराष्ट्र पत्रकार संघाच्या www.maharashtrapatrakar.com या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या . 🔸मेल [email protected] 🔸दुसरा संपर्क फोन -9422420611 🍥🍥 विलासराव कोळेकर, Ad.प्रकाश साळसिंगीकर,…ग्रुप एडमीन 🍥🍥




