गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण
आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
“मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा”।।….. **************
सुंदरता नसली तरी चालेल!
सोज्वळता असली पाहीजे!!
सुगंध नसला तरी चालेल!
दरवळ असायला पाहिजे!!
नातं नसलं तरी चालेल!
आपुलकीचे बंधन असायला पाहिजे!!
भेट होत नसली तरी चालेल!
स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
आपणास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.




