Thursday, August 27, 2026
Home Health उत्तम आरोग्यासाठी एकशे चोवीस मौलिक सूचना.

उत्तम आरोग्यासाठी एकशे चोवीस मौलिक सूचना.

उत्तम आरोग्यासाठी एकशे चोवीस
  मौलिक सूचना.

१. दररोज न चुकता ३०
 मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने
 चालायाला जा . (लक्षात
 असू द्या “चालला तो
 चालला,थांबला तो
 संपला”)

२. दररोज कोणतेही
 एकतरी फळ खावे.
(खास करून सफरचंद,
 संत्रे, केळे, पपई, सीताफळ,
आवळा यापैकी एखादे)

३. दररोज सकाळी अनुशा पोटी
कोमट पाण्यात एक चमचा
 लिंबाचा रस व एक चमचा
 मध घालून प्या.

४. प्रक्रिया केलेले पदार्थ
 खाण्या ऐवजी शक्यतो पूर्ण
 जेवण करा.

५. कृत्रिम रंग व गोडी
 आणणारी साखर यांचा
 वापर करून केलेले घन /
 द्रव पदार्थ खाणे टाळा. 

६. दुपारचे व रात्रीचे
 जेवणाची सुरुवात सॅलेड
 खाण्याने करा. 

७. दिवसातून दोन वेळा ३
 ते ५ मिनिटे दीर्घ श्वास
 घेण्याचा  प्रघात ठेवा.

८. रात्री शांत झोप
 लागण्या साठी , झोपण्या पूर्वी
मनाचा थकवा जाऊन मन
 प्रसन्न  व्हावे यासाठी
 दोन मिनिटे एखाद्या
 सुगंधाचा भरभरून वास घ्या.

९. रात्री झोपण्या पूर्वी अर्धी
मूठ आक्रोड खा.

१०. दिवसभर थोड्या थोड्या
वेळाने भरपूर पाणी प्या.
 (दिवसातून किमान 5 लिटर)

११. सकाळी १०-१५ मिनिटे
शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे
 ऊन घ्या.

१२. दररोज १०- १५ मिनिटे
 जॉगिंग  करा.

१३. दररोज १०-१५ मिनिटे
पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)

१४. जेवणातील पदार्थात
 भरपूर विविधता असू द्या,
(म्हणजे प्रमाण जास्त नको
 तर जास्त पौष्टिक असावे)

१५.  शांत चित्ताने हळूहळू
 संथपणे नीट चाऊन खा.
 (वाघ मागे लागल्या सारखे
भराभरा न चावता नुसते
 गिळू नका)

१६. दोन जेवणाचे मध्ये
 छोटा उपहार घ्या.

१७. जीवनात नेहमी आनंद
 व हास्य असू द्या.

१८.  सकाळची न्याहरी
 घेणे कधीच चुकवू नका.

१९. रात्रीची झोप किमान
 सात तास घ्या.

२०. रात्रीची झोपण्याची
 वेळ काटेकोर पणे पाळा.
 (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे )

२१. आहारात तंतुमय
 (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.

२२. जेवणात रसरशीत
 नैसर्गिक रंग असलेले
 अन्न-पदार्थ असू द्या.

२३. योगासन वर्ग लावा व
 योगासने करा. किमान
 बारा सूर्य नमस्कार घाला.

२४. प्रेम व आनंद देणार्या
 व्यक्ति सदैव तुमच्या
 सभोवताली असतील
 याची दक्षता घ्या
.
२५. लक्षात ठेवा
 आरोग्याला चांगले
 असणारे पदार्थ जिभेला
 आवडतीलच असे नव्हे.

२६.  दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.

२७. घाम येईल इतका
 व्यायाम करा.

२८. आर्थिक तणाव
 टाळण्या साठी किमान
 एक वर्षाच्या खर्चाला
 पुरेल एव्हढी रक्कम
 सेव्हिंग करा.

३०. आठवड्या तून दोनदा
 तरी ३० मिनिटे पुलअप –
 पुशअप व्यायाम करा.

३१.  जेवणा पुर्वी अर्धा
 तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.

३२. वर्षातून एकदा
 ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.

३३. एक घास बत्तीस वेळा
 चाऊन खा.

३४.  ‘ड’ जीवनसत्व युक्त
 पूरक आहार
 (supplementary) घ्या.

३५. जेवणात दोन चमचे
 गाईचे तूप वापरा.

३६. म्हशीच्या दुधात
 जास्त स्निग्धांश
 असलेल्या दूधाचे ऐवजी
  गाईचे कमी स्निग्धांश
 असलेले दूध वापरा.

३७. सकाळच्या न्याहरीत
 भाजणीचे थालीपीठ, सांजा, पोहे,
भाज्याचे पराठे असे सकस
व पौष्टिक पदार्थ  असावेत.

३८.  जेवणा सोबत कृत्रिम
 थंड पेये घेणे टाळा.
(कोका कोला , थम्स अप,
 लीम्का इत्यादी.)

३९. जेवणापूर्वी हात-पाय
 साबणाने स्वच्छ धुवा व
 निर्जंतुक करा.

४०. नेहमी गरम  व ताजे
 जेवण घेत जा.

४१. रोज थोडा आल्याचा
 छोटा तुकडा खा.

४२. रोज एक- दोन
 लसणाच्या कच्च्या
 पाकळ्या खा.

४३. साखरेचा वापर
 अतिशय कमी करा.

४४. पदार्थ बनवताना
 तेलाचा वापर शक्य
 तितका कमी करा.
वरुन कच्चे तेल घेऊ नका.
 तळणी साठी एकदा
 वापरलेले तेल पुन्हा
 वापरू नका ..

४५. एकाच प्रकारचे तेल न
 वापरता करडई, शेंगदाणा,
 सनफ्लॉवर, सोयाबीन, पाम,
राईसब्रान, मोहरी, ऑलीव्ह
 अशी मिश्र तेल एकत्र
 करून वापरल्यास
 प्रत्येका तील काही चांगले
 गुणधर्म मिळून येतील.

४६. भाता साठी हातसडी चा
किंवा बिन सडलेला  तांदूळ
 वापरा.

४७. गिरणी तून गहू दळून
 आणताना त्यात सोयाबीन
 घाला. (एक किलोला १०० ग्राम)

४८. सकाळी दोन खजुर,
 राजगिरा लाडू / रोल
 , मोरावळा खावा.

४९. आहारात नाचणीचा
 समावेश करा.

५०. शक्य तितके मिठाचे
 प्रमाण कमी करा.
 भाजी, आमटी, पदार्थ
 अळणी वाटल्यास वरून
 मीठ घालून घेऊ नका.

५१.  जास्त खाणे टाळा .
 (लक्षात ठेवा “अति खाणे
 अन् मसणांत जाणे”)

५२.  झोपण्या पूर्वी किमान
 ३ तास आधी काहीही
 खाऊ नये / जेवू नये.

५३. जेवणा नंतर शत पावली
 घाला . (शंभर पावले चाला)

५४. जेवणा नंतर लगेच
 झोपू नका.

५५. आठवड्या तून एक
 वेळ उपवास करा.

५६. दिवसातून १० मिनिटे
 मौनव्रत पाळा.

५७. आठवड्या तून किमान
एकदा मैदानी खेळ खेळा.

५८. दिवसा तून एकदा अर्धा
तास चांगल्या पुस्तकांचे
 वाचन करा.

५९. सकाळी आंघोळी नंतर
दहा मिनिटे प्रार्थना करा.

६०. सकाळी आंघोळी नंतर
 दहा मिनिटे “ध्यान”
 (Meditation) करा.

६१. इतरां बरोबर स्वत:ची
 तुलना कधीही करू नका.

६२. तुमच्या आवडी चेच
 काम करा.

६३. नावडते काम / नोकरी
 ताबडतोब सोडा.

६४. सदैव तुमच्या
 कुटुंबियां च्या संपर्कात /
 सान्निध्यांत रहा.

६५. मित्रांच्या
 सान्निध्यांत रहा.

६६. रोज एका तरी
 व्यक्तीच्या हिताचे /
 भल्याचे कृत्य करा.

६७. रोज एका तरी
 व्यक्तिला माफ करत जा.

६८. जेंव्हा दमल्या सारखे
 वाटेल तेंव्हा थोडी विश्रांती
 घ्या / आराम करा.

६९. मुक्तपणे जोरात हसा.

७०. धूम्रपान वर्ज्य करा.

७१. मद्यपान वर्ज्य करा.

७२. गुटखा / तंबाखू  आदी
 व्यसनां पासून  दूर रहा.

७३. पत्त्यांचा जुगार,
 मटका, रेस, अशा
 मार्गांपासून दूर रहा.

७४. आठवड्या तून काही
 वेळ निसर्गाच्या
 सान्निध्यांत घालवा.

७५. सकाळी दंव पडलेलं
 असतांना हिरवळी वरून
 अनवाणी चाला.

७६. जरूर असेल तेंव्हा
 मदत मागा.

७७. सकारा त्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्न
पूर्वक मनातून काढून टाका.

७९. लिफ्ट  वापर न करता
 जिन्यांचा वापर करा.

८१.दूध, अंडी, मासे, चीज,
हिरव्या पालेभाज्या  अशा
 कॅल्शियम युक्त पदार्थांचा
 आहारात समावेश करा.

८२. हिरव्या पालेभाज्या ,
 सॅलड ,कोशिंबीरी (यात
 मोड आलेली कच्ची
 कडधान्ये असावीत)
 भरपूर प्रमाणात खा.

८३. मोड आलेली कडधान्यां च्या
उसळी करून खा. 

८४.  मधून मधून डोळे व
 चेहरा गार पाण्याने धुवा.

८५. वर्षातून एकदा ट्रीपला
 जाऊन येत जा.

८६. आरामदायी पादत्राणे वापरा.

८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.

८८. मुक्तपणे व आनंदाने गा.

८९. तडस लागेल इतके न
 जेवता पोटात जेव्हढी
 जागा (भूक) असेल त्याच्या
 फक्त ८०% खा.
(लक्षात ठेवा “दोन घास
 भुकी तो सुखी”)

९०. एखाद्या जवळ च्या
 जुन्या मित्राशी / स्नेह्याशी
 वेळ काढून ५-१० मिनिटे
 फोनवर बोला.

९१. तुमच्या दातांची योग्य
 निगा राखा /काळजी घ्या.
 सकाळी व रात्री दोन वेळा
 ब्रशने दांत साफ करा.

९२. बागकामात मन रमवा.

९३. सूती व सैल कपडे
 वापरा, तंग कपडे वापरणे टाळा.

९४. नियमित पोहायला जा.

९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.

९६. जीवनाचा उद्देश व
 उद्दीष्ट लक्षात घेऊन जगा
 व जीवनातील आनंद लुटा.

९७. नियमित पणे मोकळ्या
 हवेत / बागेत फिरायला
 जात जा.

९८. नियमित पणे नाटक /
 सिनेमा / संगीताचा
 जलसा / व्याख्यान अशा
 अभिरुची संपन्न / मनोरंजन
 कार्यक्रमास अवश्य जा.

९९. तुम्ही दमला असाल
 तरीही रेटून काम न करता
 थोडा वेळ काढून आराम
 करा / विश्रांती घ्या.

१००. प्रकृतीच्या कारणाने
 कधी कधी कामास नकार
 द्यायला शिका.

१०१. तुमची प्रतिकार शक्ती
वाढण्या साठी मधाचा
 योग्य वापर करा.

१०३. आरोग्या साठी
 स्वयं चलित वाहना ऐवजी
सायकलचा वापर करा.

१०४. तुमच्या भावनिक
 समस्या इतरां जवळ
 व्यक्त करू नका.

१०५. नकारात्मक व्यक्तीं ना टाळा
/ तुमच्या पासुन दोन हात
 दूरच ठेवा .

१०६. एखाद्या समाज हिताच्या
 कार्यात स्वयं सेवक म्हणून
काम करा.

१०७. नियमित रक्तदान करा.

१०८. समाजाचे ऋण मान्य
करून परतफेड म्हणून
 सेवाभावी संस्थांना यथा शक्ती
मदत करा.

१०९. साधी रहाणी व उच्च
 विचार सरणी ठेवा.

११०. एक नवी परोपकार
 वही चालू करून त्यांत
 रोज केलेल्या एका तरी
 परोपकाराची नोंद करत जा.

१११. पैशांची व अन्नाची
  उधळ पट्टी करू नका.

११२. लोणची, फरसाण
 असे खारवलेले पदार्थ
 जास्त खाऊ नका.
 त्यांत मोनोसॅ च्युरेटेड
 फॅटस् असतात जी
 आरोग्याला घातक असतात.

११३.भजी, वडे, कुरर्डया, पापड,
पापड्या असे तेलकट पदार्थ
 जे आरोग्याला अपायकारक
आहेत, कमी प्रमाणात खा. 

११४. मैदा, मैद्याचे आणि
 बेकरीचे बिस्किटे, केक
 असे पदार्थ कमी प्रमाणात खा.

११५. बाजारात  मिळणारे
 जंक व फास्ट फूड खाणे टाळा.

११६.श्रीखंड , बासुंदी, गुलाबजाम ,
लाडू असे मिठाईचे गोड
 पदार्थ मोजकेच खा व
 मनावर संयम ठेवा.

११७. अतिरिक्त चहा,
कॉफी, एरिएटेड थंड पेये न
 पिता रवी खालचे ताजे
 अदमुरे गोडसर ताक, लिंबू
 सरबत, सोलकढी, कोकम,
ताज्या फळांचे रस प्या.

११८. शिळे, नासलेले , आंबलेले
अन्न व उतरलेली फळे
 खाऊ नका.

११९. बाजारात अस्वच्छ
 जागी उघड्या वर बनवलेले
  पदार्थ खाऊ नका.

१२०. शेवग्या च्या शेंगा,
 कारली, कुळीथ, हादग्या ची फुले,
अळू, पुदिना, कढीपत्ता, मेथी,
मुळा, पालक,कांदापात,
 लसूणपात, गवार, सुरण, लिंबू,
कोथिंबीर, आले ह्या  व
 अशा अनेक हर्बल भाज्यां चा
त्यांचे गुणधर्म लक्षांत
 घेऊन जेवणात जाणीव पूर्वक
वापर करावा.

१२१. ऋतुमाना नुसार आहारात
 योग्य बदल करत जा .

१२२. शक्यतो शाकाहारच
 घ्यावा.
मांसाहार वर्ज्य करावा.

१२३. जिभेला कायम
 लगाम घालून ताब्यात
 ठेवावे, तिचे जास्त चोचले
 पुरवत बसू नये.
 (लक्षात असू द्या की जीभ
 ज्याची आग्रहाने मागणी
 करते ते नेहमीच
 आरोग्यास अपायकारक
 असते)

१२४. प्रकृतीस न झेपणारे
 उपास करू नयेत त्यांनी
 अपायच होतो.
आरोग्याचे नियम पाळा आजार टाळा

मी आरोग्य संवाद ग्रुप
न 62 चा अडमिंन काशिनाथ खरसे
 सध्या रहायला भोसरी पुणे येथे आहे.
माझी मिसेस
सौ. संगीता काशिनाथ खरसे हिला पोट दुखीचा त्रास होता म्हणून आम्ही एक महिन्या पूर्वी सोनोग्राफी केली. सोनोग्राफी मध्ये डॉक्टरांनी सांगितले साडेसहा मीलिमिटर चा स्टोन आहे. हे कळाले नंतर
आम्ही डाँ राजू गोल्हार
(आहार तज्ञ व निसर्ग उपचार तज्ञ ) यांचा सल्ला घेतला
सरांनी  आम्हाला
सांगितल्या प्रमाणे कुळीत(हुलगे)
 दहा दिवस १०० ग्राम रोज
रात्री भिजून सकाळी आनखी पाणी टाकुन पानी न बदलता  उकळून शिजुन  घेतले.
पानी पिऊन आणि शिल्लक उसळ जिरे धने पावडर निंबु अँड करुन खाल्लि १० दिवस
मग
पंधरा दिवसांनी म्हणजे काल  ६/९/२०१९ रोजी गायकवाड हॉस्पिटल येथे सोनोग्राफी केली . आम्हाला आश्चर्याचा  धक्काच बसला कारन
 डॉक्टरांनी सांगितले कि
तुम्हाला मुतखडा नहिए आता काहीही प्रॉब्लेम नाही  खडा वैगरे काहीही नाही.  म्हणजे खडा थोडक्यात विरघाला आणि पोट दुःखी बंद झाली.
सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही उपाय केला.
राजु गोल्हार 🙏
 सरांचे खूप खूप आभार !!!
आम्हाला फरक पडला जर कोनाला मुतखड्याचा त्रास
असेल तर नक्की कुळीता
चा हा प्रयोग करावा.
१०० रुपयाच्या आत खर्च
कुठल्याही साईडईफेक्ट नाहि
आँपरेशन करायची गरज पन नाही
जर आपल्या कुन्या नातेवाईकाला असेल तर
हा रामबाण ऊपाय आवश्यकच
करा
मि
काशिनाथ खरसे
आरोग्य संवाद ग्रुप 62
सदस्य
व अँडमिण
ह. मुक्काम भोसरी
पुणे
संपर्क क्रमांक
9822414768
🙏🙏
आरोग्य संवाद ग्रुप हा
9922315555
राजु गोल्हार यांनी
 आरोग्य संदर्भात मोफत मार्गदर्शन साठी
अौषध गोळ्या शिवाय आजारावर  उपचार बरे करन्यासाठी जनसेवेत समर्पित ग्रुप आहे
जन सेवा हिच ईश्वर सेवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments