Thursday, August 27, 2026
Home Mindset सजगतेचे भान

सजगतेचे भान

    कित्येक वेळी आपण आपले भान हरपून काही गोष्टी करत आसतो.ती गोष्ट काही वेळाने,काळाने,आपल्या लक्षात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली आसते.आणि आपण त्या घडून गेलेल्या गोष्टीचा पश्चाताप करत बसतो.स्व:ताला स्व:ताच दोष देत रहातो. कित्येकदा आपण ठरवलेले देखील आसते कि आता असे वागायचे नाही.पुन्हा ती चूक करायची नाही.तरी देखील पुढील वेळेस भान हरपून आपण ती चूक करतो.आणि पुन्हा नंतर पश्चाताप करत आसतो. असे का? बरे घडत असावे.
 
आपण आपल्या मेंदूला सतत काहीना काही प्रतिक्रिया देत आसतो.त्यातून रागाचा भावना,द्वेषाचा भावना,उत्पन्न होत असतात. आपण जी प्रतिक्रिया देणार त्या वरती ती भावना तशीच निर्माण होते.ही क्रिया एवढी जलद होते कि क्षणार्धात घडून जाते.ते आपल्याला कळत देखील नाही.त्याची प्रतिक्रिया आपल्या शरीराद्वारे,कृतीद्वारे,उमटते.याला जबाबदार आपणच आसतो.

लहान-लहान गोष्टीवरून सतत रागाचा भावनिक प्रतिक्रिया देणे.त्या सतत च्या प्रतिक्रिया मुळे मेंदूला त्याची सवय जडते.तशी एखादी घटना घडली कि क्षणार्धात मेंदू कडून प्रतिक्रिया येते आणि आपण तसे वागायला भाग पडतो.कारण आपण स्व:ताच आपल्या मेंदूला त्या सवयीमध्ये गुरफडून ठेवलेले आसते.ती सवय मोडायची म्हटले तरी खूप त्रास होतो.कारण त्या प्रतिक्रियांनी तीव्र रूप धारण केलेले आसते.काही वेळा मेंदूतील रासायनिक बिघाड हि होण्यास सुरुवात होते.आणि आपण तणाव युक्त जीवन जगण्यास सुरुवात करतो.त्याचातुनच रक्तदाब,आल्सर,सारखे शारीरिक व मानसिक आजारास सुरुवात होते.आणि आपले मानसिक संतुलन बिघडून जाते.

आपले मानसिक व शारीरिक आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत भान ठेवून जगायला शिकले पाहिजे. मेंदूला चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया देण्यापासून सजग रहायला हवे.हे बोलून किंवा माहिती घेवून महत्वाचे नाही.तर त्याची कृती करणे आणि अनुभव घेणे महत्वाचे आहे.

माझा एक मित्र होता जयेश,हॉस्पिटल फिल्ड मध्ये काम करायचा,खूप चांगला मुलगा होता,प्रत्येक गोष्टीत लक्ष देवून काम करत असत.त्याला कामाचा तान वाढू नये म्हणून त्याचा सोबतीला एक राज नावाचा मुलगा दिला.तोही तेवढाच मेहनती आणि हुशार होता.काही दिवस त्यांचे मैत्रीचे नाते चांगले चाले होते पण काही दिवसानंतर जयेश मात्र त्याचा राग-राग करायला लागला.त्याचावर चिडचिड करायला लागला.त्याचा त्या चिडचिड आणि रागाचा परिणाम त्याचा कामावरती होऊ लागला.सतत कामामध्ये चुकी करायला लागला.बेजाबाबदार रहायला लागला.त्याच्या या वागण्याने त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.

काही दिवसापूर्वी मला तो मुंबई मध्ये भेटला,त्याची विचारपूस केली.तेव्हा त्याने बोलायला सुरुवात केली,सध्या मी घरीच आसतो.मनोविकारतज्ज्ञ यांचा गोळ्या चालू आहेत.पूर्वी पेक्षा बारा आहे.मी त्याला सहज विचारले तू एवढा हुशार,कामामध्ये आमचा ही पेक्षा वरचढ तुला अचानक असे का झाले.राग-राग का करायला लागलास,का चिडचिड करायचास काही घरी प्रोब्लेम होता का?

त्याने बोलायला सुरुवात केली.माझा जोडीदार राज आणि मी खूप चांगले मित्र होतो.मी त्याला सगळे काम शिकवले,तो हि खूप हुशार आणि चांगला होता.आगोदर तो पुढे-पुढे काम करताना मला विश्रांती मिळायची पण नंतर-नंतर त्यालाच सगळे काम सांगायचे प्रत्येक गोष्टीत तो पुढे असायचा,मला ते खूप हार्ट व्हायचे.त्याचा मुळे मी स्वताला कमी लेखायला लागलो.माझी खूपच चीड-चीड वाढली.स्वताचा राग वाटू लागला.कामामध्ये मन लागेना,त्यातून मला माझी नोकरी गमवावी लागली.याचा खूपच परिणाम माझा वरती झाला घरी ही सगळ्यांशी भांडण होत रहायचे. मी काय करतो व काय नाही मलाच कळत नव्हते.वडिलांनी हॉस्पिटल मध्ये भरती  केले होते आता गोळ्या चालू आहेत.आता थोडे बरे वाटते .

त्याची अशी परिस्थिती होण्याचे कारण काय असावे, स्वतःहून केलेली चुकी आणि त्याला सतत वाटणाऱ्या द्वेषाचा,रागाचा सतत  मेंदूला तीव्र स्वरूपाच्या  प्रतिक्रिया.आपणच आपली मानसिकता बनवायला आपणच भाग पडतो.

या साठी आपण भान ठेवून असणे खूप गरजेचे आहे. कसे वागावे व कोणत्या प्रतिक्रियांना कसे सामोरे जावे याचे भान ठेवणे खूप महत्त्वाचे,आणि माईंडफुलनेस  सजगता ध्यान,हेच आपल्याला शिकवते.योग्य विचार करण्याची क्षमता ठेवणे.मेंदूकडून येणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांना,प्रतिक्रिया न देता पहाणे.विचार करताना,बोलताना,चालताना,बसताना,क्षणा-क्षणाला प्रत्येक गोष्टीत सजगता ठेवायला भान ठेवायला या सजगता ध्यान,मधून शिकायला मिळते.

अधिक माहितीसाठी व माइंडफुलनेस प्रशिक्षण साठी खालील संकेतस्थळी नाव नोंदणी करा

https://manacheoperation.com/event-registration-form/

           – राहुल दळवी
      माईंडफुलनेस प्रशिक्षक
          7066217153

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments