Thursday, August 6, 2026
Home Mindset THINK POSITIVE

THINK POSITIVE

THINK POSITIVE

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.
यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.
 नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्‍वास,
मनोबल वाढवतात.

नकारात्मक विचारांना –
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच – मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले – हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली. 
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार – सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.

तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे – तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे –
मी तुझी आहे,
मी तुझी आहे…. …

मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. 
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.

सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून – अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो.

नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते – चुका होतात – हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’

बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’

तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं – तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला,

बुध्दांना हेच सांगायचे होते की, जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा.

मी अस्वस्थ आहे,
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.

काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत
डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत ….

So Be Positive

#ThinkPositive #BePositive #Success #Mindset

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments