पडला परत बायकोच्या प्रेमात.
थकलीस तूही राणी आता,
मदत करतो तुला घरात.
धन्य वाटलं राणीला
तिचे डोळे आले भरून
मीठ मोहऱ्या घेऊन आली
म्हणाली, “दृष्ट टाकते काढून.”
“कोणतं काम आवडेल तुला ?”
राणी विचारी प्रेमाने
“कपडे आवरीन, भांडी लावीन .”
वदला राजा उत्साहाने
कपडे न् भांड्याचा ढीग पाहून
चेहरा जरा उतरला.
पण निश्चय त्याचा झाला होता.
आता मदत करायचीच हिला.
कपड्यांचा आकार छोटा करणे.
हीच घडीची व्याख्या.
कुठलंही भांडं कुठल्याही जागेवर.
अशी कामाची पद्धत त्याच्या.
पळी चिमटा सापडेना कुठे.
तिच्या कामाचा गोंधळ उडे!
कपडा, धुतलेला आहे की पारोसा
असा तिला प्रश्न पडे.
ओटा आवरायला करतो मदत.
नॉनस्टीक मधे टाकतो सुऱ्या, उलथनी.
काचेची आणि स्टीलची भांडी
एकत्र ठेवतो ड्राय बाल्कनीत.
उगाच काढतो रद्दी सगळी
विकून येतो बाजारात
एक पेपर ठेवत नाही, औषधाला सुद्धा घरात.
आधणाचं पाणी घालण्यासाठी रश्श्याला, जरा वळली पाठ की भांडं घासून पालथं घालतो ओट्याला.
भाजी चिरता सालं डेखं
ताबडतोप उचलतो.
पण अरे देवा ! घाईघाईत
सगळं सुक्या कचऱ्यात टाकतो.
हैराण झाली राणी,
हात आपसूक गेला कपाळाकडे.
तशी म्हणतो,”एवढी मदत केली तरी तुझे तोंड वाकडे.
तिला आता समजेना
हसावे की रडावे
कामे सगळी निस्तरावी
की कौतुक यांचे करावे.
राणीला ना सुचले तोडगे
सोडवण्याला समस्येला
काही बोलले की रूसाफुशी.
कसे सोडवावे पेचाला !
आता राजा आहे खुष
करतो घरातली सारी कामे.
राणी सुद्धा उत्तम आहे.
करून घेतली सवय तिने.
कारण काही का असेना , होतो दोघांचा जरा संवाद
वेळ घालवतात एकत्र
साथ देतात एकमेकांस
थोडी चेष्टा थोडी भांडणं
हे तर सारं करत राहू, ठरवलं आहे दोघांनीही
ही फेज एंजॉय करू.




