Thursday, August 6, 2026
Home poem प्रिय डिसेंबर महिना ,

प्रिय डिसेंबर महिना ,

कितीरे  वाट पहायला लावतोस ….

अगदी वर्षाच्या  शेवटी  येतोस बघ
बारा भावंडातील शेंडेफळ  ना…
म्हणून सर्वांचा  लाडका …..
हिरव्यागार निसर्गाच्या पायघड्यांवरून ,  धुक्याची  शाल लपेटून , गुलाबी  थंडी पसरवत   एखाद्या रूपगर्वितेसारखा  दिमाखात येतोस .
सर्वांना  भरभरुन  चैतन्य  व उत्साह देतोस  अगदी हातचे काही न राखता   ……
भरपूर खा …  प्या ….व्यायाम करा  असा संदेश घेऊन   तू येतोस  त्यामुळे  दिवाळीनंतर  आलेली  मरगळ  झटकून  गृहिणी परत  लगबगीने  खाद्य पदार्थ  करायला लागतात .
सुरुवात  होते ती  डिंकाच्या  लाडवाने .  बाजरीचा  भात ,  वांग्याचे  भरीत ,  मिरचीचा  ठेचा ,  त्याबरोबर   गरम गरम  भाकरी , हुलग्याचे  शिंगोळे ,  वेगवेगळ्या  चटण्या  यामुळे  रसना  तृप्त होते .  हा स्वर्गिय  आनंद  फक्त  तूच  देऊ  शकतोस .
हुरडा पार्टी  तर  तुझ्याशिवाय होतच  नाही .आणि  पतंगोत्सव  तो  तुला  मानाचा  शिरपेच देऊन जातो .
रात्री  शेकोटीच्याभोवती बसून  मारलेल्या  गप्पा , गाणी  यांचा  आनंद  केवळ  अवर्णनीय …..
अश्या  सर्व  उत्साहवर्धक  वातावरणातच  तुझ्यामुळे   आम्हाला मिळतात .
नाताळ हा  खरे तर आपला  सण नाही  पण …….
जायच्या आधी  तू  आम्हाला  तो भेट म्हणून देतोस ,  तुझ्यावरच्या  प्रेमाने  आम्ही  तो  स्वीकारतो  आणि  सांताक्लाँजच्या  प्रेमात पडून   नाताळचा  आनंद  घेतो .
तू  आम्हाला  खूप जवळचा  वाटतोस………
वर्षभरातील  सर्व  गुपिते   उघड करण्याचे  हक्काचे  ठिकाण  म्हणजे  तू  ……..
वर्षभरातील  केलेल्या चुकांची कबुली  व नवीन संकल्प  तुझ्याच साक्षीने होतात .
चांगल्या वाईट गोष्टींचा पाढा  तुझ्या समोरच  वाचला जातो .
पण सर्व  माफ  करुन नवीन उमेद  तूच देतोस .
आणि येतो तो तुला  निरोप  देण्याचा  दिवस ………..
तुझ्यामुळे  आम्हाला नवीन वर्ष   ,  चुका सुधारण्याची संधी ,  नवी स्वप्ने  साकारण्याची  जिद्द मिळते  म्हणून आम्ही  धूमधडाक्यात तुला निरोप देतो .
या कृतज्ञता सोहळ्यात  गुंग  असतानाच  तू हुलकावणी देऊन  निघून जातोस ………
हुरहुर  लावून ………
मन हळवं  करुन …….
 सदैव तुझ्या प्रेमात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments