Attitude असणाऱ्यांनो उघडा डोळे बगा नीट .. रजनी माणूस म्हणून भारी असल्याचे अनेक किस्से आपण वाचलेत, ऐकलेत.
हा ताजा किस्सा कालपरवाचा आहे.
आपल्याला कुणी जवळचं भेटलं तर आपण हस्तांदोलन करतो,
इथं रजनीकांतनी पाय धरलाय !
घटनाच तशी आहे..
केरळमधील पलक्कड येथे राहणारा २१ वर्षीय प्रणव रजनीकांतना भेटण्यासाठी परवा दिवशी त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थळी पोहोचला होता.
प्रणव हा इतर चाहत्यांप्रमाणे सामान्य नाही.
त्याला दोन्ही हात नाहीत. त्यामुळे रजनीकांतनी या दिव्यांग चाहत्याला भेटल्यावर हात मिळवण्याऐवजी पाय धरुन स्वागत केलं !
रजनीने अचानक पाय हाती घेतल्याने प्रणवला काहीच सुचलं नाही, त्याचे डोळे मात्र पाणावले…
प्रणव दोन्ही पायांच्या जोरावर अनेक कामे करतो. त्याने रजनीकांतची २० मिनिटे भेट घेतली. दरम्यान त्या दोघांचे फोटो दक्षिणेकडील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रजनीचा हा एटिट्यूड अनुकरणीय आहे…
ब्राव्हो थलैव्हा..
– कृष्णा के. देशमुख
पत्रकार संघ पुणे शहर …..




