‘अचूकवार्ता’ साप्ताहिक मुंबई मध्ये लेख प्रसिध्द.
दि-24/11/2019
——————————————–
“मनाचे अॉपरेशन”हा विषय गहन आणि अगदी सुलभ आहे.जो कोणी “मनाचे अॉपरेशन”करण्यास शिकेल तो ‘स्वयंदिप’ हो ऊन जाईल.
आपले ‘मन’ सतत स्थूल अवस्थेत असते,त्याला सूक्ष्म करण्यास आपण शिकायला हवे!
आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावरती आपल्या मनाला घेऊन जाता येते.आपल्या शरीरावरती होणारी संवेदना सुक्ष्म -अतिसूक्ष्म पध्दतीने आपण मनाद्वारे समजू शकतो.
खरे तर स्थूल मनाला अनेक गोष्टी गमवाव्या लागतात.जेवण करताना,काम करताना,सहलीला गेले असताना अशा अनेक प्रकारच्या घटनांचा आपण मनाच्या स्थूल अवस्थेत आनंद घेता येत नाही.कधी कधी तर याच स्थूल मनामुळे आपले करियर,जॉब धोक्यात येतात,तर विद्यार्थी अभ्यास करून ही परिक्षा वेळेस पेपर व्यवस्थित लिहीत नाहीत.मनाची अवस्था ओळखणे कठीण जाते.
या मनाला सूक्ष्म करण्यास शिकले पाहिजे,मनाला सूक्ष्म करण्याचा सराव केला पाहिजे. सूक्ष्म मनाच्या अवस्थेने आपल्याला वर्तमानाचा आनंद घेता येतो.स्वतःला परिपक्व बनवता येते.मनात येणारे विचार उत्पन्न होणाऱ्या भावना,शरीरावरती निर्माण होणाऱ्या सूक्ष्म-अतिसूक्ष्म संवेदना यांना पहाता येते,मनाची अवस्था ओळखता येते.मनाची अवस्था समजून घेऊन योग्य विचार करण्याची क्षमता निर्माण करता येते. एवढेच नाही तर,आपल्या मनाला शांत ठेवून मानसिक समस्यांपासून मुक्त ठेवता येते.
हे सांगणे व ऐकणे जेवढे सोपे वाटते.तेवढे ते सोपे नाही,पण सहज आहे.याचा सराव माञ वेळोवेळी प्रत्येक दिवाशी करावा लागतो.तो सराव कसा करायचा ते आपण पुढील भाग-३ मध्ये पहाणार आहोत.
अधिक माहितीसाठी व मानसिक समस्या निवारणास खालील संकेतस्थळी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हा!
https://manacheoperation.com/event-registration-form/
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक:संशोधक
08104643065
www.manacheoperation.com




