Thursday, August 27, 2026
Home Story 👏आई & बाबा👏🙏

👏आई & बाबा👏🙏

मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला.
.
म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा….
.
 मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला,
.
“अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ?
.
सकाळी फोन करता आला नसता का ?”
.
शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला.
.
 काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला,
.
तब्बल दोन तास बोलला.
.
 नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली
.
 तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला,
.
 शेवटी तिनंच फोन कट केला..
.
 नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला.
.
आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, “बाबा, सकाळी करायचा ना फोन …
.
आताच आईचा फोन येऊन गेला. तिने …” 
.           
 वडील म्हणाले, “मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की
.
 तुझी आई खरंच वेडी आहे,
.
 मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली.
.
 खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे.
.
पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते,
.
की तातडीनं ऑपरेशन करून मूल अॅबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल.
.
पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती.
.
तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची.
.
रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा.
.
संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता.
.
त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत !
.
 पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली.
.
 डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की
.
तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून …
.
तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
.
आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली
.
त्याबद्दल तिला माफ कर.
.
 एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते
.
 आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का
.
 …. फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता.
.
असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला.
.
 मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता.
.
सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला.
.
आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली.
.
 वडील म्हणाले , “ती नेहमी म्हणायची,
.
आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही.
.
आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन.
.
” आई म्हणाली, “असू द्या हो  माफ करा त्याला ….”
.
आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं.
.
तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते
.
तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते
.
पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.
 
🍥☝🏽एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही…

एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही…

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं…

आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही…🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments