Thursday, August 6, 2026
Home Business ✍ उद्योजकता विजडम

✍ उद्योजकता विजडम

——————–
🔸. जीवनात व व्यवसायात🕹 ब्रेकचा वापर करावा.
——————–
📌🚄 गाडी वेगाने कशामुळे धावते?

📌 असा प्रश्न एका व्याख्यानात श्रोत्यांना केला तेव्हा अनेकांनी इंजिन, पेट्रोल, अॅक्सलेटर, चाके अशी उत्तरे दिली.

 📌परंतु मित्रहो थोडा वेळ 🤔विचार करा, जर समजा गाडीला ब्रेकच नसता तर तुम्हाला गाडी खूप लांब चालविता आली असती का? तर नाही._

📌वेगावर नियंत्रण ठेवता येण्यामुळेच जगातील कोणतीही गोष्ट किंवा वाहन चालते.

📌 ज्या गोष्टीला थांबण्यासाठी ब्रेक नाही अशा गोष्टी वादळाप्रमाणे सुसाट जातात व धडकून नष्ट होतात.

📌 जसा आकाशातून पडलेला उल्का. गोष्टी थांबल्या आणि योग्य ठिकाणी थांबल्या तर फायद्याच्या असतात. उदा. सूर्यप्रकाश झाडाच्या पानावर थांबल्यावर अन्न तयार होते.

📌🚙 ज्या गाडीला ब्रेक नाही अशी गाडी कितीही मोठ्या ब्रॅंडची असो, 🚝इंजिन कितीही चांगले असो त्याचा उपयोग नाही.

📌 व्यवसाय करत असताना कधी किती वेगाने जायचं, कधी 🚦ब्रेक मारून थांबायचं हे कळायला हवं.

📌 सीसीडी ब्रॅंड आपल्या कॅफेच्या शाखा धडाधड उघडत गेला. पण वेगाने पुढे जायच्या नशेत आपल्या हातून काय चुका होत आहेत याचा अंदाज न आल्याने व एक दिवस याच प्रशंसनीय व कोट्यवधींच्या ब्रॅंडच्या मालकाला आत्महत्या करायची वेळ आली.

📌 🚧 रस्त्याला असणारे स्पीड ब्रेकर हे चांगल्यासाठीच असतात.

 📌🕹 गाडीचा ब्रेक हा चांगल्यासाठीच असतो.

📌 शाळेला/ऑफिसला रविवारी सुट्टी चांगल्यासाठीच असते. दिवाळी. ख्रिसमस, उन्हाळीसुट्टी चांगल्या साठीच असते.

📌 पाश्चात्य देशात शनिवारी व रविवारी लोक अगदी कडक सुट्टी घेतात, अगदी 📱मोबाईलसुध्दा बंद असतात. त्यामुळेच त्याची कार्यक्षमता जगात सर्वाधिक आहे. थांबल्याने हळूहळू चालल्याने फरक नाही पडत.

📌 आपण गोष्टीमध्ये कासव शर्यत जिंकल्याचे वाचले आहे. कुठं थांबायचं, किती वेळ थांबायचं, किती वेग कमी करायचा ह्याचा विजडम/शहाणपण हे चिंतनाने व विचार केल्याने येते.

🙏🌐 उद्योजक जोडुयात उद्योजक घडवूयात🌐🙏

Previous articleSocial media
Next articleपिढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments