टीकेतून जे साधत नाही ते शाबासकीतून, कौतुकातून साधता येते. पण बर्याच जनांना हे माहित नसते. दुसर्याची काही चूक झाली तर ती दाखवायला ते जितक्या तत्परतेने पुढे सरसावतात तितक्या तत्परतेने एखाद्या व्यक्तिने केलेली एखादी चांगली गोष्ट गौरवायला ते जात नाही वा जमत नाही.
ज्यांनी जे चांगले केले आहे त्याची दखल घेऊन त्याबद्दल त्यांची वाहवा केल्यास चांगल्या गोष्टी करण्याबद्दलचा त्यांचा उत्साह वाढतो. चांगल्या गोष्टीची स्तुती, कौतुक, प्रशंसा करताना मात्र दोन गोष्टी निश्चीतपणे लक्षात ठेवाव्यात/घ्याव्यात. एक म्हणजे खोटी प्रशंसा, कौतुक करायच नाही आणि दुसरे म्हणजे नुसतेच छान किंवा चांगले असे न म्हणता नेमके काय छान किंवा चांगले वाटले ते सांगायचे.
टीका करणे अगदी क्रमप्राप्तच असेल तर ती जरूर करावी, पण ती करताना दोन गोष्टीचे आवर्जून भान पाळावे. एक म्हणजे टीका चुकीच्या वागण्यावर किंवा वाईट कृतीवर असावी. दुसरे म्हणजे टीकेचा सूर रागाचा अथवा धिक्काराचा नसावा.
मिञांनो, इतरांचा स्वीकार करणे म्हणजे त्यांचे ऐकणे, त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांचा दृष्टीकोन, भावना, इच्छा, मते आणि कल्पना याविषयी त्यांचा अधिकार मान्य करणे व त्यांना स्वीकारणे होय.
शेवटी, प्रशंसेच्या परिणामातून प्रशंसनीय वर्तन वाढू शकते. हे आपण सर्वांनी जाणले पाहिजे, समजले पाहिजे व उमगले पाहिजे.🙏🏻🙏🏻🙏🏻




