लोकमतच्या रविवारच्या अंकात वाचा ! – वसंत भोसले
‘‘मारलेले तरुण खरंच आरोपी होते की, दबावापोटी पकडून आणलेली फाटकी मुलं, हे आता कधीही समोर येणार नाही… कायद्याला वळसा घालण्याची अशी क्रूर पद्धत रुजू नये.’’
‘‘हैदराबादला महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. गुरुवारी रात्री तपासासाठी घटनास्थळी नेले असताना यातील एका आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या गोळीबारात हे चारही संशयित आरोपी मारले गेले. या एन्काऊंटरच्या घटनेची सत्यता काहीही असली तरी आज संपूर्ण देश मात्र पोलिसांच्याच बाजूने उभा आहे. आरोपी मारले गेले असले तरी समाजातील ही विकृत पुरुषी मानसिकता कधी मरणार?’’




