1 – जास्त खाल्याने वजन वाढते आणि कमी खाल्याने वजन कमी होते.
सत्य – ज्या पदार्थाने इन्सुलिन वाढते त्याने वजन वाढते .उदा. साखर, गूळ, मध,मैदा, भात, बटाटा, साबुदाणा इ.
2 – व्यायाम केल्यानंतर काहिही खाल्लं तरी वजन कमी होईल.
सत्य – व्यायाम केल्यानंतर इतर वेळेस जास्त आराम होतो. तसेच व्यायामानंतर भूक जास्त लागते. व्यायामात जास्त काळ सातत्य रहात नाही.
योग्य आहारा बरोबर व्यायाम करणे योग्य.
3 – जास्तवेळा थोडे थोडे खाल्ल्याने वजन कमी होते.
सत्य – जास्त वेळा खाणे होते पण कमी खाणे होत नाही. असा आहार काही विशेष परिस्थितीत योग्य – लहान मुले, गरोदर माता,आजारी व्यक्ती इ. साठी योग्य
4 – कमी कॅलरीज खाल्याने वजन कमी होते.
सत्य – कमी खाल्ल्याने शरीर मंदावते .BMR कमी होतो त्यामुळे वजन कमी होत नाही.
5 – डायबेटिस हा अनुवांशिक आजार आहे त्यामुळे त्याला आम्ही काही करू शकत नाही.
सत्य – डायबेटीस साठी अनुवांशिकतेचे योगदान अत्यंत कमी असते . मुख्यतः जीवन शैलीतील चुकांमुळे डायबेटीस होतो . त्या मुळे योग्य त्या बदलामुळे डायबेटीस वर मात करणे सोपे आह
6 – माझी ब्लड शुगर नॉर्मल आहे म्हणजे मी कितीहि साखर खाऊ शकतो.
सत्य – साखर सर्वांसाठी अपायकारक आहे. रक्तातील साखर वाढण्याअगोदर शारीरिक नुकसान होत असते . साखर नॉर्मल असेल तरी वाढलेले वजन हे डायबेटीसचे लक्षणं असते
7 – माझे वजन नॉर्मल आहे म्हणून मी काहीही आणि कितीही खाऊ शकतो.
सत्य – शरीराचे वजन हा ढोबळ मापदंड आहे . बऱ्याचवेळा वजन योग्य असताना डायबेटिस असतो.
त्यासाठी सर्वानी योग्य प्रकारे आहार घ्यावा.
8 – अंड्याचा पिवळा भाग खाणे आरोग्यासाठी अपायकारक आहे कारण त्याने कोलेस्टेरॉल वाढते.
सत्य – ही जुनी समजूत होती .नवीन संशोधन अनुसार खाल्लेल्या कोलेस्टेरॉल ने काही त्रास होत नाही आणि ते कमी करून फायदा नाही.
9 – कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदय विकार होतो.
सत्य – नवीन संशोधन अनुसार कोलेस्टेरॉल उपकारक असते . हृदयविकार इतर कारणामुळे होतो.
10 – डायबेटीस/ रक्तदाब हे कधीही बरे न होणारे आजार आहेत.
सत्य – योग्य जीवन शैली मूळे हे आजार सहज आटोक्यात येतात. बहुसंख्य लोक पूर्ण बरे होतात.
11 – डायबेटीस आणि रक्तदाब या साठी मरेपर्यंत औषधे घ्यावी लागतात.
सत्य – योग्य जीवनशैली असल्यास औषधांची गरज फार कमी होते.
12 – डायबेटीस च्या पेशंट ने साखरे ऐवजी गूळ/ मध खाणे चांगले.
सत्य – साखरेबरोबर सर्व प्रकारचे गोड पदार्थ खाऊ नयेत.
13 – डायबेटीस च्या पेशंट ने गोड नसलेली किंवा खारी बिस्किटे खावीत.
सत्य – खाण्यास सर्वात वाईट गोष्टी म्हणजे गोड पदार्थ, बेकरी चे सर्व पदार्थ, तयार – प्रोसेसज्ड फूड- पाकिटातून/ कारखान्यात तयार होणारे सर्व पदार्थ
14 – तुप / शेंगदाणे / अंडी / पनीर खाल्ल्याने वजन वाढते .
सत्य – वरील पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिन कमी प्रमाणात तयार केले जाते त्या मुळे वजन वाढत नाही.
15 – सकाळी मध घेतल्याने वजन कमी होते.
सत्य – मध खाण्यात आल्यास साखर आणि वजन वाढते.
16 – योगासनं केल्याने वजन कमी होते.
सत्य – योगासने हा अत्यंत आवश्यक व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे शरीराची लवचिकता चांगली होते. पण वजनात फ़रक पडत नाही
17 – पोटाचे व्यायाम केल्याने पोट कमी होते.
सत्य – व्यायामाने सगळी कडची चरबी कमी होण्यास मदत होते. विशिष्ट ठिकाणचीच चरबी कमी होत नाही.
18 – काही पावडरी/ गोळ्या/औषधे/ इ मुळे वजन आणि डायबेटीस कमी होते.
सत्य – अशा प्रकारचे सर्व उपचार तात्पुरते आणि अशास्त्रीय आहेत. या उपचारामुळे शारीरिक नुकसान होते. तसेच असे उपचार अत्यंत महागडे असतात.
19 – मानसिक परिस्थितीचा वजन आणि डायबेटीसशी काही संबंध नाही .
सत्य – ताण तणावाचे योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. त्याशिवाय वजन कमी होणे अवघड असते.
20 – Bournvita , कॉम्प्लेन, बुस्ट , milo इ दुधात घेण्याच्या पावडरी मुलांना आवश्यक आहेत.
सत्य – या आणि अशा सर्व प्रकारच्या गोष्टी पूर्णतः अनावश्यक आणि त्रासदायक आहेत . त्याऐवजी शेंगदाणे/खोबरे कित्येक पटीने अधिक प्रमाणात योग्य आहे. जाहिरातींच्या नादी लागू नये.
21 – झोप आणि वजनाचा / डायबेटीस चा काही संबंध नाही
सत्य – निवांत आणि आरामदायी झोपेमुळे ब्लड शुगर आणि वजन आटोक्यात राहते .
22 – डायबेटीस च्या पेशंटने भूक नसली तरीही खाल्लेच पाहिजे
सत्य – भुक नसेल तर जेवण नाही केले तरी चालते त्यासाठी डॉक्टरांशी बोलून औषधे बदलावीत .
23 – सकाळचा नाश्ता आवश्यक आहे
सत्य . आपल्या सोयीनुसार खाण्याच्या वेळा ठरवाव्यात आणि त्यानुसार औषध घ्यावे.
24 – डायबेटीस च्या पेशंट ने उपवास करू नयेत.
सत्य – डायबेटिस च्या पेशंटने डॉक्टरच्या सल्ल्याने उपवास करावेत. निरंकार उपवास आरोग्यासाठी खूपच आवश्यक आहेत .
25 – प्रत्येक माणसाला रोज थोडी तरी साखर खाणे आवश्यक असते
सत्य – साखर किंवा पिष्टमय पदार्थ मानवी शरीराला पूर्णतः अनावश्यक आहेत. प्रथिने – essential amino acids – आणि स्निग्ध – essential fatty acids – पदार्थ आवश्यक असतात. शरीरात आवश्यक तेवढी साखर तयार करण्यात येते – gluconeogenesis – . त्यामुळे जेवणातून पिष्टमय पदार्थ / साखर खाणे अनावश्यक आहे.
26 – फळे खाल्ल्याने वजन कमी होते .
सत्य – फळामध्ये कॅलोरी कमी असतात पण फलामधील ग्लुकोज मुले इन्सुलिन वाढते आणि त्या मुळे फ्रुक्टोज चे चरबी मध्ये रूपांतर होऊन वजन वाढते
डॉ चंद्रकांत कणसे
एम. डी., मेडिसिन




