एक महिला भेंडीची भाजी करण्यासाठी भेडी कापत होती. अचानक तिला भेंडीच्या वरील बाजूला छिद्र पडलेले दिसले. तिने विचार केला की भेंडी खराब झाली आहे ती फेकून द्यावी. पण तिने ती फेकून न देता खराब झालेला तेवढा भाग कापून फेकून दिला. पुन्हा पाहिले असता अजून थोडा भाग खराब दिसला. तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला भेंडीचा अर्धा भाग कापून भाजीत टाकला.
किती चांगली गोष्ट आहे. ५० पैशांची भेंडी आपण किती ध्यान देऊन कापतो. जो भाग खराब आहे तो कापून फेकून देतो. उरलेला भाग स्वीकारतो. खूप चांगले आहे हे. मात्र दुःख या गोष्टीचे आहे की, आपण माणसाविषयी एवढे कठोर का वागतो? आपल्या जवळच्या एखाद्या माणसाविषयी एक चूक दिसली तर त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला आपण कापून फेकून देतो. त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. आपण फक्त आपल्या अहंकारासाठी त्याच्यासोबतचे प्रत्येक नाते तोडतो. मग एकच प्रश्न पडतो की, आपल्या जवळच्या माणसाची किंमत पन्नास पैशांच्या भेंडीपेक्षाही कमी आहे का? या छोट्याशा गोष्टीचा अवश्य विचार करा आणि आपल्या जवळच्या अमूल्य माणसांना लहान लहान चुकांसाठी जीवनातून वेगळे करू नका.